Maharashtra State Board Class 7 Maths Syllabus

या भागात इयत्ता – सातवी विषय – गणिताच्या अभ्यासक्रमविषयी माहिती घेऊया. 

Maharashtra State Board Class 7 Maths Syllabus

Maharashtra State Board Class 7 Maths Syllabus in Marathi
Medium


क्रमांक

घटक

उपघटक

विभाग पहिला

1

भौमितिक रचना

  • कोनदुभाजक
  • रेषाखंडाचा लंबदुभाजक
  • त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म
  • त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म
  • त्रिकोणाचा अंतर्मध्य
  • त्रिकोणाचा  परिमध्य किंवा परिकेंद्र
  • त्रिकोण रचना
    • त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे.
    • त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता
      त्रिकोण काढणे.
    • दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता
      त्रिकोण काढणे.
    • कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे
  • रेषाखंडांची एकरूपता
  • कोनांची एकरूपता
  • वर्तुळांची एकरूपता

2

पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार

  • पूर्णांक संख्यांचा गुणाकार
  • पूर्णांक संख्यांचा भागाकार

3

मसावि-लसावि

  • सहमूळ संख्या
  • जोडमूळ संख्या
  • संख्येचे मूळ अवयव पाडणे
  • महत्तम सामाईक विभाजक (मसावि)
  • मूळ अवयव पद्धती
  • मसावि काढण्याची भागाकार पद्धत
  • लघुतम सामाईक विभाज्य (लसावि)
  • लसावि व मसावि यांचा उपयोग

4

कोन व कोनांच्या जोड्या

  • कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग
  • संलग्न कोन (लगतचे कोन)
  • कोटिकोन
  • पूरक कोन
  • विरुद्ध किरण
  • रेषीय जोडीतील कोन
  • विरुद्ध कोन
  • विरुद्ध कोनांचा गुणधर्म
  • बहुभुजाकृतीचे आंतरकोन
  • त्रिकोणाचा बाह्यकोन
  • बाह्यकोनाचा गुणधर्म

5

परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया

  • परिमेय संख्या
  • परिमेय संख्यांवरील क्रिया
  • बेरीज, वजाबाकी,
    गुणाकार व भागाकार
  • परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या
  • परिमेय संख्यांचे दशांशरूप
    • खंडित दशांशरूप
    • आवर्ती दशांशरूप
  • पदावली
    • पदावली सोडवण्याचे नियम

6

घातांक

  • पाया व घातांक
  • वर्ग व घन
  • पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार
  • समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार
  • दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात
  • (am)n
    म्हणजे घातांकित संख्येचा घात
  • घातांकांचे नियम
  • पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे
  • दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे
  • दिलेल्या संख्येचे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे
  • भागाकार पद्धतीने वर्गमूळ

7

जोडस्तंभालेख

  • जोडस्तंभालेख
  • जोडस्तंभालेखाचे वाचन
  • जोडस्तंभालेख काढणे

8

बैजिक राशी व त्यांवरील क्रिया

  • बैजिक राशी
    • चल
    • सहगुणक
    • पद
    • सजातीय पदे (सरूप पदे)
    • विजातीय पदे (भिन्नरूप पदे)
  • बैजिक राशींचे प्रकार
    • एकपद राशी
    • द्‌विपद राशी
    • त्रिपद राशी
    • बहुपद राशी
  • बैजिक राशींची बेरीज
    • एकपदींची बेरीज
    • द्‌विपद राशींची बेरीज
  • बैजिक राशींची वजाबाकी
  • बैजिक राशींचा गुणाकार
    • एकपदीला एकपदीने गुणणे
    • द्‌विपदीला एकपदीने गुणणे
    • द्‌विपदीला द्‌विपदीने गुणणे
  • एकचल समीकरणे

विभाग दुसरा

9

समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

  • समप्रमाण
  • व्यस्तप्रमाण
  • भागीदारी

10

बँक व सरळव्याज

  • विविध खाती
    • चालू खाते
    • बचत खाते
    • आवर्ती ठेव खाते
    • मुदत ठेव
  • रास
  • एकूण व्याज

11

वर्तुळ

  • वर्तुळाचा परीघ
  • परीघ व व्यास संबंध
  • वर्तुळकंस
    • लघुकंस
    • विशालकंस
    • अर्धवर्तुळकंस
  • केंद्रीय कोन व कंसाचे माप
    • केंद्रीय कोन
    • लघुकंसाचे माप
    • विशालकंसाचे माप
    • वर्तुळाचे माप
    • अर्धवर्तुळकंसाचे माप

12

परिमिती व क्षेत्रफळ

  • परिमिती
  • क्षेत्रफळ
    • चौरसाचे क्षेत्रफळ
    • आयताचे क्षेत्रफळ
    • काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ
    • त्रिकोणाचे क्षेत्रफळ
  • पृष्ठफळ
    • इष्टिकाचितीचे पृष्ठफळ
    • घनाचे पृष्ठफळ

13

पायथागोरसचा सिद्धान्त

  • काटकोन त्रिकोण
  • पायथागोरसचा सिद्धान्त
  • पायथागोरसच्या सिद्धान्ताचा पडताळा
  • पायथागोरसचे त्रिकुट

14

बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार

  • वर्गविस्तार
    • (a + b)2 = a2 + 2ab + b2
    • (a b)2 = a2  – 2ab + b2
  • (a + b) (a – b) चा विस्तार
    • (a + b) (a – b) = a2 – b2
  • बैजिक राशींचे अवयव पाडणे
    • द्‌विपदीचे अवयव पाडणे

15

सांख्यिकी

  • सरासरी
  • वारंवारता वितरण सारणी
    • वारंवारता
    • दिलेल्या माहितीवरून वारंवारता सारणी तयार करणे

1. भौमितिक रचना : 

मागील इयत्तांमध्ये आपण भूमितीतील मूलभूत घटक जसे की बिंदू, रेषाखंड व रेषा,
किरण व प्रतल यांचा अभ्यास केला होता. तसेच कंपास पेटीतील कंपासच्या साह्याने
कोन दुभाजक काढणे याचाही अभ्यास केला होता. त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या
पाठात आपण त्रिकोणाचे बाजूवरून व कोणावरून पडणारे प्रकार यांचा अभ्यास केला
होता. त्रिकोणाचे काही गुणधर्म अभ्यासले होते.

     या पाठात आपण त्रिकोणाच्या कोनांच्या
दुभाजकांचा गुणधर्म व त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म यांचा
अभ्यास करणार आहोत. तसेच त्रिकोणाचा अंतर्मध्य व परिमध्य म्हणजे काय? याचाही
अभ्यास करणार आहोत. या पाठात आपण त्रिकोणाच्या वेगवेगळ्या प्रकारे रचना करणार
आहोत यामध्ये त्रिकोणाच्या तीन बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे,
त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असतात त्रिकोण
काढणे, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण
काढणे, कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे अशा वेगवेगळ्या
प्रकारे त्रिकोणाची रचना आपण अभ्यासणार आहोत. याशिवाय आपण रेषाखंडाची एकरुपता,
कोनाची एकरूपता आणि वर्तुळाची एकरूपता यांचा अभ्यास करणार आहोत.

 

2. पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार : 

 मागील इयत्तेत आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय? हे पाहिले होते तसेच
पूर्णांक संख्येची बेरीज व वजाबाकी यांचा अभ्यास केला होता. या इयत्तेत आपण
पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार यांचा अभ्यास करणार आहोत.

 

3. मसावि-लसावि :

 मागील इयत्तेत आपण मसावी व लसावी यांचा अभ्यास केला होता. या इयत्तेत
आपण मसावी व लसावी यांविषयी अधिक अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण सहमूळ संख्या
म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? हे पाहणार आहोत. तसेच संख्येचे मूळ अवयव
कसे पाडतात याचा अभ्यास करणार आहोत. दिलेल्या संख्यांचा मसावि मूळ अवयव पद्धती
व भागाकार पद्धती या दोन पद्धतीने काढणार आहोत. तसेच आपण लसावी म्हणजेच लघुत्तम
सामाईक विभाज्य याचाही अभ्यास करणार आहोत. पाठाच्या शेवटी लसावी व मसावी यांचा
उपयोग अभ्यासणार आहोत.

 

4. कोन व कोनांच्या जोड्या :

 मागील इयत्तेत आपण कोनाची ओळख करून घेतली होती. कोन दुभाजक कसा काढायचा
हेही अभ्यासले होते. या इयत्तेत आपण कोन व कोनाच्या जोड्या याविषयी अधिक माहिती
घेणार आहोत. कोनाचा अंतर्भाग व बाह्य भाग यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच
कोनाच्या जोड्यांमध्ये संलग्न कोन म्हणजे काय? कोटी कोन म्हणजे काय?
पूरक कोन म्हणजे काय? विरुद्ध किरण म्हणजे काय? रेषीय जोडीतील कोन
म्हणजे काय? विरुद्ध कोन म्हणजे काय? तसेच विरुद्ध कोनाचा गुणधर्म यांचा
अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बहुभुजाकृतीचे आंतरकोन पाहणार आहोत. त्रिकोणाचे
बाह्यकोन आणि बाह्यकोनाचा गुणधर्म यांचा अभ्यास करणार आहोत.

 

5. परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया : 

मागील येते आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, ऋण संख्या व धन संख्या म्हणजे
काय? हे अभ्यासले होते. तसेच पूर्णांक संख्या म्हणजे काय? आणि पूर्णांक
संख्येची बेरीज व वजाबाकी यांचा अभ्यास आपण केला होता. या इयत्तेत आपण पूर्णांक
संख्या व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांना समाविष्ट करणारा संख्या समूह
म्हणजेच परिमेय संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. परिमेय संख्या म्हणजे काय? हे
पाहणार आहोत. त्याबरोबरच परिमेय संख्यांवरील क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी,
गुणाकार व भागाकार याचा अभ्यास करणार आहोत. परिमेय संख्यांचे खंडित दशांशरूप व
आवर्ती दशांशरूप यांचा अभ्यास करणार आहोत. पाठाच्या शेवटच्या भागात आपण पदावली
म्हणजे काय? आणि पदावली सोडवण्याची नियम यांचा अभ्यास करणार आहोत.
 
 
6. घातांक :

या पाठात आपण पाया व घातांक म्हणजे काय? हे पाहणार आहोत. तसेच वर्ग व घन
म्हणजे काय? यांचाही अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण घातांकाचे काही नियम
अभ्यासणार आहोत जसे की पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार, समान
पाया असलेल्या घातांक संख्यांचा भागाकार, दोन संख्यांच्या गुणाकाराचा व
भागाकाराचा घात यांचा अभ्यास करणार आहोत, पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे
हेही अभ्यासणार आहोत. 

 

7. जोडस्तंभालेख :

 मागील इयत्तेत आपण आलेख कागदाची ओळख करून घेतली होती आणि स्तंभालेखाचा
अभ्यास केला होता. या येतेत आपण जोडस्तंभालेख म्हणजे काय? हे पाहणार आहोत.
जोडस्तंभालेखाचे वाचन आणि जोड स्तंभालेख कसा काढला जातो हे शिकणार आहोत.

 

8. बैजिक राशी व त्यांवरील क्रिया : 

 मागील इयत्तेत आपण समीकरण म्हणजे काय? समीकरणाची उकल म्हणजे काय? समीकरण
सोडवणे म्हणजे काय? याचा अभ्यास केला होता. या पाठात आपण बैजिक राशी व त्यावरील
क्रिया अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण बैजिक राशी म्हणजे काय? चल, सहगुणक व
पद म्हणजे काय? याचा अभ्यास करणार आहोत. सजातीय पदे व विजातीय पदे म्हणजे काय?
हेही पाहणार आहोत. याशिवाय आपण बैजिक राशींचे प्रकार जसे की एकपद राशी, द्विपद
राशी, त्रिपद राशी आणि बहुपद राशी यांचाही अभ्यास करणार आहोत. बैजिक राशींची
बेरीज, वजाबाकी व गुणाकार यांचाही अभ्यास करणार आहोत. पाठाच्या शेवटच्या भागात
आपण एकचल समीकरणांचा अभ्यास करणार आहोत.

 

9. समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण : 

 इयत्ता सहावीत आपण दोन संख्यांची तुलना करून ती गुणोत्तराच्या
स्वरूपात कशी लिहायची? याचा अभ्यास केला होता. या इयत्तेत आपण समप्रमाण व
व्यस्तप्रमाण म्हणजे काय? याचा अभ्यास करणार आहोत. तसेच पाठाच्या शेवटच्या
भागात आपण भागीदारी म्हणजे काय? हे पाहणार आहोत तसेच त्यावरील उदाहरणे
सोडवणार आहोत. 

 

10. बँक व सरळव्याज : 

 मागील येतेत आपण बँकेविषयी माहिती घेतली होती. बँकेतील खाती म्हणजे
काय? व्याज म्हणजे काय? मुद्दल म्हणजे काय? मुदत म्हणजे काय? याचा अभ्यास
केला होता. एका वर्षीसाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा विचार करता काही
उदाहरणे सोडवली होती. या इयत्तेत आपण बँकेतल्या वेगवेगळ्या खात्यांविषयी
माहिती घेणार आहोत. जसे की चालू खाते, बचत खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव
म्हणजे काय? हे पाहणार आहोत. रास म्हणजे काय? हेही अभ्यासणार आहोत. मुद्दल,
व्याजदर व कालावधी दिला असता व्याज सूत्राच्या साह्याने कसे काढतात? याची
काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. 

 

11. वर्तुळ : 

 मागील इयत्तांमध्ये आपण वर्तुळाची त्रिज्या, जीवा व व्यास म्हणजे काय?
हे पाहिले होते. कंपासच्या साह्याने वर्तुळ कसे काढतात हेही अभ्यासले होते.
त्रिज्या व व्यास यांच्यामधील संबंध यांचा अभ्यास केला होता. वर्तुळाचा
अंतर्भाग व बाह्यभाग म्हणजे काय? वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? हे अभ्यासले
होते. वर्तुळ कंस म्हणजे काय? याचाही अभ्यास केला होता. या येतेत आपण
वर्तुळाचा परीघ व व्यास यांमधील संबंध अभ्यासणार आहोत. वर्तुळ कंसामध्ये
लघुकंस, विशालकंस, अर्धवर्तुळकंस म्हणजे काय? हे पाहणार आहोत. वर्तुळाचा
केंद्रीय कोन व कंसाचे माप यामध्ये केंद्रीय कोन, लघुकंसाचे माप, विशाल
कंसाचे माप, वर्तुळाचे माप व अर्ध वर्तुळकंसाचे माप यांचा अभ्यास करणार
आहोत.

 

12. परिमिती व क्षेत्रफळ : 

 मागील इयत्तांमध्ये आपण आयताच्या व चौरसाच्या परिमितीचे सूत्र व
क्षेत्रफळाचे सूत्र यांचा अभ्यास केला होता. त्यावरील काही शाब्दिक उदाहरणे
सोडवली होती. या इयत्तेत आपण परिमिती वरील काही उदाहरणे सोडवणार आहोत आणि
चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि
त्रिकोणाचे क्षेत्रफळ यांचा अभ्यास करून त्यावरील काही शाब्दिक उदाहरणे
सोडवणार आहोत. पृष्ठफळ म्हणजे काय? याचाही आपण अभ्यास करणार आहोत.
त्यामध्ये इष्टिकाचितीचे व घनाचे पृष्ठफळ यांचा 
अभ्यास करणार आहोत.

 

13. पायथागोरसचा सिद्धान्त : 

 या पाठात आपण काटकोन त्रिकोण म्हणजे काय? हे पाहणार आहोत. त्यानंतर गणिती
शास्त्रज्ञ पायथागोरसचा ‘पायथागोरसचा सिद्धांत’ अभ्यासणार आहोत व त्यानंतर
पायथागोरसच्या सिद्धांताचा पडताळा करणार आहोत. पाठाच्या शेवटच्या भागात
पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय? हे पाहणार आहोत.

 

14. बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार : 

 या पाठात आपण बैजिक राशींचा विस्तार पाहणार आहोत. वर्ग
विस्तार 
(a + b)2  व (a  b)2  यांचा विस्तार पाहणार आहोत. (a + b) (a – b) यांचा विस्तार पाहणार आहोत. पाठाच्या शेवटच्या भागात आपण बैजिक
राशींच्या अवयव पाडणे. यामध्ये द्विपदीचे अवयव पाडणे यांचा अभ्यास करणार
आहोत.

 

15. सांख्यिकी : 

 या पाठात आपण सरासरी म्हणजे काय? हे पाहणार आहोत. तसेच सरासरी वरील
काही शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत. त्यानंतर वारंवारता वितरण सारणी म्हणजे
काय? याचा अभ्यास करणार आहोत. वारंवारता म्हणजे काय? आणि दिलेल्या माहितीवरून
वारंवारता सारणी कशी तयार करतात याचा अभ्यास आपण करणार आहोत.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *