|
|
| अभ्यासक्रम |
या भागात इयत्ता – सहावी विषय – गणित च्या अभ्यासक्रमविषयी माहिती घेऊया.
विभाग पहिला
1. भूमितीतील मूलभूत संबोध :
पाचवी इयत्तेत आपण समांतर रेघा व लंब रेघा म्हणजे काय याचा अभ्यास केला होता. या वर्गात आपण भूमितीतील मूलभूत घटक अभ्यासणार आहोत. यात बिंदू, रेषाखंड व रेषा, किरण, प्रतल या भूमितीतील मूलभूत घटकांचा अभ्यास करणार आहोत. तसेच समांतर रेषा व एकसंपाती रेषा म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत.
2. कोन :
पाचवीत कोणाविषयी आपण कोनाचे घटक कोणते व कोनाला नाव कसे द्यायचे याचा अभ्यास केला होता. याशिवाय कोनाचे कोनमापकाने मापन करणे व दिलेल्या मापाचा कोन काढणे आणि कोनाचे काटकोन, लघुकोन व विशालकोन ही प्रकार अभ्यासले होते.
या इयत्तेत आपण शून्य कोन, सरळ कोन,प्रविशाल कोन व पूर्ण कोन म्हणजे की ही पाहणार आहोत. कोनदुभाजक म्हणजे काय व कंपासपेटीतील वेगवेगळ्या साधनांच्या मदतीने कोनदुभाजक कसा काढायचा हे शिकणार आहोत.
3. पूर्णांक संख्या :
या पाठात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या,ऋण संख्या व धन संख्या संख्या म्हणजे काय ही पाहणार आहोत. पूर्णांक संख्या म्हणजे काय? त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या, पूर्णांक संख्येची बेरीज व वजाबाकी, पूर्णांक संख्येचा लहान-मोठेपणा व विरुद्ध संख्या म्हणजे काय? हे अभ्यासणार आहोत.
4. अपूर्णांकांवरील क्रिया :
चौथीत असताना आपण अपूर्णांकांचा अर्थ, लेखन व वाचन यांचा अभ्यास केला होता. पाचवीमध्ये सममूल्य अपूर्णांक,समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांक, अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी व पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांचा अभ्यास केला होता. या इयत्तेत अपूर्णांकांवरील क्रिया जसे की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार यांचा अभ्यास करणार आहोत.
5. दशांश अपूर्णांक :
पाचवीत असताना आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांशचिन्ह, शतांशस्थान, दशांश अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकांचा उपयोग, दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी याचा अभ्यास केला होता. या पाठात आपण दशांश अपूर्णांक यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार पाहणार आहोत. तसेच व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर व दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकांत रूपांतर अभ्यासणार आहोत.
6. स्तंभालेख :
इयत्ता पाचवीत सांख्यिकी माहितीचे चित्ररूपात कसे रूपांतर करायचे म्हणजेच सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख कसा काढायचा याचा आपण अभ्यास केला होता. या इयत्तेत आपण आलेख कागदाची ओळख करून घेणार आहोत तसेच सांख्यिकी माहिती वरून स्तंभालेख काढणार आहोत.
7. सममिती :
या पाठात आपण सममिती म्हणजे काय व प्रतिबिंब सममिती म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत तसेच आलेख कागदावर सममित आकृत्या काढणार आहोत
8. विभाज्यता :
इयत्ता पाचवीत आपण विभाजक किंवा अवयव म्हणजे काय? विभाज्य म्हणजे काय? याचा अभ्यास केला होता. तसेच विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये 2 ची, 5 ची व 10 ची विभाज्यतेची कसोटी आपण अभ्यासली होती. इयत्ता सहावीत आपण आणखी काही विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासणार आहोत. यामध्ये 3 ची, 4 ची आणि 9 ची विभाज्यतेची कसोटी आपण अभ्यासणार आहोत व त्यावरील काही उदाहरणे पाहणार आहोत.
9. मसावि लसावि :
इयत्ता पाचवी आपण विभाजक किंवा अवयव म्हणजे काय विभाज्य म्हणजे काय याचा अभ्यास केला होता. या इयत्तेत आपण मसावि व लसावि म्हणजे काय आणि दिलेल्या संख्यांचा मसावि व लसावि कसा काढावा याचा अभ्यास करणार आहोत
विभाग दुसरा
10. समीकरणे :
या पाठात आपण समीकरण म्हणजे काय? समीकरणाची उकल म्हणजे काय? समीकरण सोडवणे म्हणजे काय? याचा अभ्यास करणार आहोत.
11. गुणोत्तर – प्रमाण :
मागील इयत्तांमध्ये आपण कोणत्याही दोन संख्यांची तुलना कशी करायची हे शिकलो आहोत. या इयत्तेत आपण आणखी वेगळ्या प्रकारे तुलना कशी करता येईल हे अभ्यासणार आहोत. तसेच गुणोत्तरासंबंधी काही बाबी अभ्यासणार आहोत आणि उदाहरण सोडवण्याची एकमान पद्धत अभ्यासणार आहोत.
12. शेकडेवारी :
या पाठात आपण शेकडेवारी म्हणजे काय? हे पाहणार आहोत. याशिवाय शेकडेवारी ची माहिती अपूर्णांकाच्या रूपात आणि अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशी लिहायची? हे शिकणार आहोत. शेकडेवारी वरील शाब्दिक उदाहरणेही सोडवणार आहोत.
13. नफा – तोटा :
या पाठात आपण नफा म्हणजे काय? तोटा म्हणजे काय? एकूण खरेदी किंमत म्हणजे काय? हे पाहणार आहोत. याशिवाय शेकडा नफा व शेकडा तोटा म्हणजे काय? हे अभ्यासणार आहोत. तसेच दिलेल्या माहितीच्या आधारे शेकडा नफा व शेकडा तोटा यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करणार आहोत व सोडवणार आहोत.
14. बँक व सरळव्याज :
या पाठात आपण बँके विषयी माहिती घेणार आहोत.बँकेतील खाती म्हणजे काय? बँकेच्या वेगवेगळ्या ठेवी यांविषयी माहिती घेणार आहोत. तसेच व्याज म्हणजे काय? मुद्दल म्हणजे काय? मुदत म्हणजे काय? हे पाहणार आहोत. तसेच या इयत्तेत आपण एका वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा विचार करणार आहोत.
15. त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म :
या पाठात आपण त्रिकोणाचा अभ्यास करणार आहोत. त्रिकोणाचे बाजूंवरून व कोणावरून कोणते प्रकार पडतात? याचा अभ्यास करणार आहोत. त्रिकोणाचे काही गुणधर्म अभ्यासणार आहोत
16. चौकोन :
या पाठात आपण कोणत्या आकृतीला चौकोन म्हणतात याचा अभ्यास करणार आहोत. तसेच चौकोनाचे वाचन व लेखन कसे करायचे हे ही अभ्यासणार आहोत. चौकोनाच्या लगतच्या बाजू, चौकोनाच्या संमुख बाजू, चौकोनाचे लगतचे कोन, चौकोनाचे संमुख कोन, चौकोनाचा कर्ण याचाही अभ्यास करणार आहोत. तसेच बहुभुजाकृती म्हणजे काय हे पाहणार आहोत.
17. भौमितिक रचना :
या पाठात आपण काही भौमितिक रचना शिकणार आहोत. यामध्ये लंब व लंबदुभाजक यांचा समावेश आहे. रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला गुण्याचा उपयोग करून, कोन मापकाचा उपयोग करून, कंपासचा उपयोग करून लंब कसा काढावा हे अभ्यासणार आहोत. तसेच रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे हेही अभ्यासणार आहोत. कंपासच्या साह्याने रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे हेही या पाठात आपण शिकणार आहोत.
18. त्रिमितीय आकार :
या पाठात आपण इष्टिकाचिती, घन, त्रिकोणी चिती, वृत्तचिती (दंडगोल), सूची, शंकू,गोल या त्रिमितीय आकारांचा अभ्यास करणार आहोत
|
क्रमांक |
घटक |
उपघटक |
|
विभाग पहिला |
||
|
1 |
भूमितीतील मूलभूत संबोध |
|
|
2 |
कोन |
|
|
3 |
पूर्णांक संख्या |
|
|
4 |
अपूर्णांकांवरील क्रिया |
|
|
5 |
दशांश अपूर्णांक |
|
|
6 |
स्तंभालेख |
|
|
7 |
सममिती |
|
|
8 |
विभाज्यता |
|
|
9 |
मसावि लसावि |
|
|
विभाग दुसरा |
||
|
10 |
समीकरणे |
|
|
11 |
गुणोत्तर – प्रमाण |
|
|
12 |
शेकडेवारी |
|
|
13 |
नफा – तोटा |
|
|
14 |
बँक व सरळव्याज |
|
|
15 |
त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म |
|
|
16 |
चौकोन |
|
|
17 |
भौमितिक रचना |
|
|
18 |
त्रिमितीय आकार |
|
- Maharashtra Board Class 6 Maths Syllabus
- Maharashtra State Board Syllabus for Class 6
