Class 6 | विभाज्यतेच्या कसोट्या (Tests of Divisibility)

विभाज्यता
 
विभाज्यतेच्या कसोट्या (Tests of Divisibility)
 
2 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो.
उदाहरणार्थ : 1. 158 या संख्येच्या एककस्थानी 8 हा अंक आहे. त्यामुळे ही संख्या 2 ने विभाज्य आहे.
                        2.
5 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0,5 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती संख्या 5 ने विभाज्य असते.
 
10 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0 असेल, तर ती संख्या 10 ने विभाज्य असते.
 
3 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या ब ेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 3 ने विभाज्य असते.
 
4 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील दशक व एककस्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 4 ने विभाज्य असते.
 
9 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 9 ने विभाज्य असते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *