What is Percentage? | Percentage | Mathematics

Class – 6

Subject – Mathematics

12. Percentage

What is Percentage?


1. Why Do We Need to Learn Percentage?

  • In exams, we often say “I got 80% marks”, not “I got 40 out of 50”.
  • In discounts, we see “20% off” on products.
  • In cricket, commentators say “He has a 90% strike rate.”
  • In school attendance, teachers say “Your attendance is 95%.”

So, percentage is a universal way of comparison that makes numbers easy to understand and compare.


2. What is Percentage?
When we compare parts of different totals (like marks out of 50, 80, or 100), comparing directly is confusing.So, we convert them to a common base – 100.This “out of 100” comparison is called a percentage.


3. Meaning of “Percentage”

The word Percentage comes from Latin:

  • “Per” = “by” or “for every”
  • “Cent” = “hundred” = 100

So together, “per centum” means “by the hundred” or “for every hundred.”

So, Percentage means “out of 100”.

Percentage compares one quantity to 100.


For example,

  • 45% means 45 out of 100
  • 80% means 80 out of 100

4. Mathematically

Example:

If a student scores 40 marks out of 50.

To make it out of 100 (percentage),


5. Real-Life Use of Percentage

AreaExampleExplanation
EducationExam Marks, AttendanceTo compare student performance easily
ShoppingDiscounts, Offers“50% Off” means half the original price
SportsBatting Average, Strike RateTo measure player’s performance

इयत्ता – 6 वी

विषय – गणित

12. शेकडेवारी

शेकडेवारी म्हणजे काय?


१. आपल्याला शेकडेवारी शिकण्याची गरज का आहे?

आपल्या दैनंदिन जीवनात शेकडेवारीचा वापर अनेक ठिकाणी होतो –

  • परीक्षेत आपण म्हणतो, “मला 80% गुण मिळाले.”
  • दुकानात फलक दिसतो – “20% सूट.”
  • क्रिकेटमध्ये सांगितले जाते, “त्याचा स्ट्राइक रेट 90% आहे.”
  • शाळेत शिक्षक सांगतात, “तुझी उपस्थिती 95% आहे.”

म्हणजेच, शेकडेवारी ही तुलना करण्याची सार्वत्रिक पद्धत आहे, जी संख्यांना समजण्यास आणि तुलना करण्यास सोपी बनवते.


२. शेकडेवारी म्हणजे काय?

कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची तुलना करायची असते —
उदा.एकाने 50 पैकी 40 गुण मिळवले, तर दुसऱ्याने 80 पैकी 60 गुण.
अशा वेळी थेट तुलना करणे अवघड जाते.

म्हणून आपण सर्व तुलना १०० च्या आधारावर, म्हणजेच “शंभराच्या मानाने” करतो.
या “१०० च्या मानाने” केलेल्या तुलनेलाच शेकडेवारी म्हणतात.


३. “शेकडेवारी” या शब्दाचा अर्थ

शेकडेवारी हा शब्द “शेकडा” या शब्दापासून आला आहे.
“शेकडा” म्हणजे “शंभराच्या मानाने”.
म्हणजेच शेकडेवारीचा अर्थ – १०० पैकी तुलना करणे.

उदाहरणार्थ :

  • 45% म्हणजे 100 पैकी 45 भाग
  • 80% म्हणजे 100 पैकी 80 भाग

४. गणिती रूपात

शेकडेवारी काढण्याचे सूत्र :

उदाहरण :
एका विद्यार्थ्याने 50 पैकी 40 गुण मिळवले.

म्हणजे विद्यार्थ्याला 80% गुण मिळाले.


५. दैनंदिन जीवनातील शेकडेवारीचा वापर

क्षेत्रउदाहरणस्पष्टीकरण
शिक्षणगुण, उपस्थितीविद्यार्थ्यांच्या कामगिरीची सोपी तुलना करता येते.
खरेदीसूट“50% सूट” म्हणजे अर्धी किंमत.
खेळफलंदाजी सरासरीखेळाडूची कामगिरी मोजण्यासाठी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *